धन्यवाद देवा
माझ्या डोक्याच्या केसापासून ते नखापर्यंत तू दिलेल्या अवयवांसाठी धन्यवाद देवा !
मी अतिशय समृद्ध जीवन जगत आहे. धन्यवाद देवा.!
मी माझ्या अतर्मानाशी सुसंवाद साधण्यात यशस्वी होत आहे धन्यवाद देवा !
मी सुंदर आणि निरोगी जीवन जगत आहे. धन्यवाद देवा!
माझ्यात खूप शक्ती आहेत . धन्यवाद देवा!
माझ्याकडे खूप धन-पैसा-रुपया आहे आणि अनेक मार्गांनी माझ्याकडे धन येत आहे . धन्यवाद देवा !
माझ्यातील शक्तींचा उपयोग मी माझ्या नातेवाईकांसाठी, समाजासाठी करत आहे. धन्यवाद देवा!
माझे शरीर, मन ,आत्मा पूर्णता स्वस्थ आहेत . धन्यवाद देवा !
मी नेहमी सकारात्मक विचार करतो . धन्यवाद देवा!
मी प्रत्येक निर्णय अचूक घेत आहे. धन्यवाद देवा !
दिवसेंदिवस माझ्या क्षमता वाढत आहेत . धन्यवाद देवा!
मी माझे जीवन परिपूर्ण करत आहे . धन्यवाद देवा !
मला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळवण्याची कुवत माझ्यात येत आहे. धन्यवाद देवा !
मी त्या सर्वशक्तिमान अश्या शक्तीचा अंश आहे . धन्यवाद देवा !
माझे सर्व निर्णय त्या ईश्वराच्या निर्णयाशी एकरूप आहेत. धन्यवाद देवा !
या अतिसामान्य व्यक्तीचे असामान्य गुण बाहेर आणल्याबद्दल धन्यवाद देवा !
तुला कमीपणा येईल असे कोणतेही कर्म माझ्याकडून होत नाही . धन्यवाद देवा !