स्मार्ट ट्रेडर्सची लक्षणे
शेअर मार्केटचा विचार करा पक्का
गरीबीला मारा धक्का
शेअर मार्केटचा जास्तीत जास्त अभ्यास करून त्यात उतरणारे हुशार ट्रेडर कधी निराश होत नाहीत .
हुशार ट्रेडर चे गुण ;-
- निष्णांत ट्रेडर कोणत्याही मार्केट मध्ये स्वत :चे चित्त शांत ठेवून निर्णय घेतो .
- त्याला गुंतवणुकीसाठीचा काळ ,वेळेचे भान,याचे महत्त्व असते .
- तो/ती अतिशय शांत स्वभावाचे असतात .
- चांगला ट्रेडर कधीही व्यसनी नसतो .
- टप्याटप्याने शेअर विकत घेणारा व फायदा होताच टप्याटप्याने शेअर विकणारा असतो .
- चांगला ट्रेडरला आर्थिक शिस्त असते .
- तो वाटेल तसे सौदे करत नाही .
- कोणाच्याही सांगण्यावरून तो शेअर निवडत नाही . तो स्वत: माहिती काढून सौदे करतो .
- T.V , (CNBC ,ZBUSINESS ) या वाहिन्यांमधून माहिती काढतो .
- जागतिक घडामोडींवर नजर ठेवतो .
- ज्या शेअर मध्ये जास्त मुव्हमेंट आहे असा शेअर निवडतो .
- ज्या शेअर्सचे VOLUME जास्त असते असे शेअर्स निवडतो .
- ज्या कंपन्या नियमितपणे बोनस ,डिव्हिडंड ,देतात असे शेअर निवडतो.
- कंपन्यांची BALANCE SHEET अभ्यासण्याचे कसब त्याच्याकडे असले पाहिजे .
- रोजच्या देशी -विदेशी बातम्या व त्यांचा शेअर मार्केटवर होणारा परिणाम डोळसपणे पाहणारा असतो .
- ट्रेडिंग मध्ये गुंतत जाणारा नसतो .
- रोजच्या सौद्यांची नोंदवहीत नोंद करतो . फायदा-तोट्याचा आढावा घेतो.
पैसा कमवा भरभर
श्रीमंत व्हा पटपट
मस्त फिरा जगभर
क्रमश
No comments:
Post a Comment