शेअर मार्केट रणनीती ट्रेडींगची
भारतात N.S.E. & B.S..E ला SEBI नियंत्रित करते . त्यामुळे शेअर मार्केटमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडत नाहीत .
गुंतवणूकदारांची सुरक्षितता सांभाळली जाते
काही नियम /अंदाज /अनुमान :-
- जर सेन्सेक्सची ओपेनिंग (market positive open ) मजबूत असेल . तर सकाळीच ९. ३० च्या दरम्यान आधी शेअर खरेदी करावा .आणि मग विकावा(+,-) आठवडाभरआधी अभ्यास केल्यानंतर कोणता शेअर वाढू शकतो याचा अंदाज येतो .
- जर सेन्सेक्सची ओपेनिंग (market positive open ) मजबूत असेल. पण ट्रेडिंग साठी निवडलेला शेअर आधी विकावा आणी नंतर खरेदी करावा (SHORTSELL )(-,+)
- जर सेन्सेक्सची ओपेनिंग (market negative open) कमकुवत असेल पण शेअर मजबूत (positive) असेल तर शेअर आधी खरेदी करावा व नंतर विकावा (+,-)
- जर सेन्सेक्सची ओपेनिंग (market negative open )कमकुवत असेल तर ट्रेडिंग साठी निवडलेला शेअर आधी विकावा आणी नंतर खरेदी करावा (SHORTSELL )(-,+)
करू नका धांदरटपणा
करू नका हावरटपणा
शेअरबाजारातून रुपये कमवून
अंगी आणा श्रीमंतीपणा
जोखीम
शेअर बाजार जरी एक उत्पनाचे साधन असले तरी शेअर बाजार ruthless आहे . येथे भावनेला थारा नाही . नफा किवा तोटा हे दोनच शब्द काम करतात . म्हणून कुठे थांबायचे हा निर्णय गुंतवणूकदाराचा असतो अजून भाव वाढायची वाट पहायची कि मिळालेला नफा घेऊन गप्प बसायचे हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. तोटा कोणालाच आवडत नाही . शेअर बाजारातील चढउतार कोणाच्याच हातात नसते. दिवसभरातील शेअरचा सर्वात (Low) खालचा भाव कोणालाच विकत घेता येत नाही . तसेच दिवसभरातील शेअरचा सर्वात (high) वरच्या भावाला विकता येत नाही . म्हणून गुंतवणूकदाराने विचारपूर्वक शेअर्स खरेदी करावेत. जोखीम कुठे नसते .
शेअर मार्केट मधील जोखीम आपल्या उत्पानाशी निगडीत असते. इथे रावाचा रंक होतो आणि रंकाचा रावही होतो. पण तरीही करोडो व्यवहार होत असतात. वेळ आहे मराठी माणसाने शेअर बाजारावर आपली छाप मारायची - बाजी मारायची - श्रीमंत व्हायची . म्हणून जास्तीत जास्त मराठी तरुण -तरुणींनी तरुण वयातच शेअर बाजारात उतरले पाहिजे . इथे स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही . असंख्य संधी वाट पहात आहेत. म्हणूनच महिलांचा सहभागही शेअर मार्केट मध्ये वाढत आहे. कारण महिला पैशाचे व्यवहार उत्तम हाताळतात असा अनुभव आहे. वेळीच आपल नुकसान टाळणं त्यांना चांगलं जमत.
No comments:
Post a Comment