Friday, 25 December 2015

WARREN BUFFETT नावाची जादू

वॉरन बफे नावाची जादू 


Image result for share market photos


हे माझ्या मराठी मित्र-मैत्रिणी , बंधू आणि भगिनींसाठी आहे . ज्यांना श्रीमंत व्हायची जबरदस्त आंतरिक इच्छा आहे . 

Image result for warren buffett thoughts


या व्यक्तीविषयी मी काय सांगावे . सगळ्या जगावर हि व्यक्ती  राज्य करते  .वयाच्या अकराव्या वर्षी गुंतवणूक करणारे वॉरन बफेना आपण खूप उशिरा गुंतवणूक सुरु केली  असे वाटते. वॉरन बफे  कितीतरी जणांचे प्रेरणा स्त्रोत आहेत  . काही गोष्टी जगात एकामाद्वितीय असतात . त्यांचे अनुकरण करताही येते,  पण त्यांच्यासारखे मोठे होता येत नाही. 


Image result for warren buffett thoughts


स्वप्नंच पहायची तर मोठी पहावीत . आपल्या आजूबाजूला पण अशीच मोठीच स्वप्ने पेरावीत. श्रीमंत करुनी सोडावे सकळीका. 





एक सुंदर ,सुदृढ ,समृद्ध ,समाधानी ,प्रेममयी  सामाजिक वातावरण तयार करायचे असेल तर अशा बऱ्याच गोष्टी वैयक्तिक पातळीवर न होता सामाजिक व्हावयास हव्यात  . तरच सामाजिक अराजकतेला आळा  बसू शकेल.  

वॉरन बफे सांगत असतात कि स्वत:वर पैसे खर्च करा . नवनवीन गोष्टी शिका ,स्वत:चे ज्ञान वाढवा . स्वत:ची किमंत वाढली पाहिजे . सर्वांना तुम्ही हवेहवेसे वाटले पाहिजे . आतापासून दहा -वीस वर्षांनी तुम्ही काय असलेले तुम्हाला आवडेल त्याचा विचार आजच करा .  

त्यांचे अनुभव शिकावे आणि आपण आपला मार्ग निवडावा . 



Image result for warren buffett thoughts



वृक्ष  लावणारे निघुनिया जाती 
तळी विसावती सान  थोर!




Image result for warren buffett thoughts




वरील ओळी सर्वांनाच लागू पडतात . आपले जीवन क्षणभंगूर  आहे . आपण मेल्यावर आपल्या मागे  आपल्या नातेवाईकानी  आपल्याला काय म्हणून आठवणीत ठेवावे हे प्रत्येकाने ठरवावे .  

आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शेअर मार्केट सदैव तयार आहे . शेअर बाजारावर करोडो लोकांचे संसार चालतात . आपल्यासाठी वेगळे नियम नाहीत . 

फक्त हिम्मत करून शेअर बाजारात उतरण्याची गरज आहे. सव्वा कोटी जनतेत असंख्य वॉरन बफे तयार होतील. सुरुवात मराठी माणसाकडून होईल कदाचित.







No comments:

Post a Comment