शेअर मार्केट मध्ये नव्याने येण्याची ईच्छा असणाऱ्यासाठी
शेअर मार्केट मध्ये नव्याने येण्याची ईच्छा असणाऱ्याना शेअर मार्केट विषयी जुजबी ज्ञान असायला हवे. भारतात N.S.E आणि B.S.E अशी दोन EXCHANGE आहेत जेथे शेअरची देवाण घेवाण होते. N.S.E हे B.S.E पेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते . शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी demat a /c ची गरज असते .
जे तुम्ही कुठल्याही ब्रोकर सब ब्रोकर कडे उघडू शकता .उदा . शेअरखान , निर्मल बंग , आशिष मेहता angle broking इ . किवा कोणत्याही बँकेत demat a /c उघडू शकता . कमीत कमी ब्रोकिंग चार्जेस घेऊन चांगली सर्विस देणारी ब्रोकिंग फिरं निवडा.
Technology एवढी पुढे गेली आहे कि मोबाईलचा वापर आपण ट्रेडिंगसाठी करू शकता . www ,nseindia.com तसेच moneycontrol.com या साईट्स चा अभ्यास करा.
सर्वात महत्वाचे म्हणजे लाखो कम्पन्यापैकी नेमक्या कोणत्या कंपनीचा शेअर निवडावा ? कोणता सेक्टर निवडावा ?
सर्वप्रथम तुमचा आवडता सेक्टर निवडा; बँकिंग , ऑटो,FMCG ,कॅपिटल गुड्स, CONSUMER DURABALES ,I T COMPANIES REALITY SECTOR ई .
तुम्ही निवडलेल्या co. कमीत कमी १० पेक्षा जास्त नसाव्यात
व ते शेअर्स एकाच सेक्टरमधील नसावेत.
तुम्ही तुमची सर्व इन्वेस्टंमेंट एकाच वेळी वापरायची नाही.
काही ट्रेडर्स डे ट्रेडर्स असतात , म्हणजे शेअर्सची खरेदी व विक्री ते एकाच दिवशी (same day )करता .
काही ट्रेडर्स एक दोन दिवसांसाठी शेअर्स घेतात .
काही ट्रेडर्स हे short term traders असतात ते शेअर्स खरेदी करतात व एक ते तीन किवा सहा महिन्यांच्या कालावधीत अपेक्षित profit मिळताच विकतात.
काही ट्रेडर्स हे long term traders असतात . त्यांचा हेतू गुंतवणूक हा असतो . ते आपले शेअर्स सहा महिन्यान पासून ते एक वर्ष किवा पाच वर्षे पर्यंत demat a /c मध्ये ठेवतात .
क्रमश :
No comments:
Post a Comment